मराठवाड्यात ३२ टँकरने पाणीपुरवठा संभाजीनगरातही वाढले टँकर तर परभणी, बीड व धाराशिव जिल्हे टँकरविना

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) यंदा मराठवाड्यात चांगला पाऊस झाला असला तरी कडक उन्हाळा सुरू झाल्याने बहुतांश भागात पाणी टंचाईच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने प्रशासनाकडे पाण्याच्या टैंकर्सची मागणी होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी परभणी, बीड आणि धाराशिव हे तीन जिल्हे वगळता इतर सर्वच जिल्ह्यांत पाण्याचे टैंकर्स सुरू होण्यास सुरवात झाली आहे. विभागातील छत्रपती संभाजीनगरसह, लातूर, जालना या जिल्ह्यांतील तहानलेली
२६ गावे आणि १२ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामध्ये एक शासकीय, तर ३१ खासगी टँकरचा समावेश आहे.
७४ विहिरींचे अधिग्रहण
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मराठवाड्यातील परभणी, बीड आणि धाराशिव वगळता अन्य जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. १४ एप्रिलच्या अहवालानुसार, मराठवाड्यात एकूण ७४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
३८, जालना १३, हिंगोली १३, नांदेड ५, लातूर जिल्ह्यातील ५ विहिरींचे
अधिग्रहण करण्यात आले. यात टैंकरसाठी २८ गावांतील २२ विहिरींचे,
तर टँकरव्यतिरिक्त ४० गावांतील ५२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७ गावे आणि २ वाड्यांना मिळून १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर जालना जिल्ह्यातील ८ गावे व ९ वाड्यांना १७ टँकरद्वारे, तर लातूर जिल्ह्यातील एका वाडीला एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर मराठवाड्यातील अन्य उर्वरित जिल्हे सुदैवाने अद्याप टँकरमुक्त असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालात नमूद आहे.
https:llepaper.sanjwarta.n Powered By Vruthee Solutions